पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 --"स्पंदन"-- "सरकार दरबारी घ्यावे आमचे निवेदन, समजून घ्यावे मराठी रसिकांच्या मनीचे स्पंदन।। भाषा आमुची फार हो थोर, साऱ्या भाषांवर होई शिरजोर।   काय सांगू माझ्या मराठीचा तोरा, जगभर तोंडी 'नाच रे मोरा'। मराठी आमुची फार आहे गुणी, किती सांगाव्या उखाणे आणि म्हणी। मराठीचा आमच्या लै हो थाट, बोलायला भाषा वाटे  गुळमाट।   जपून ठेवलाय इतिहासाचा ठेवा, पोवाडे ,गाणी किती लिहिलाय मेवा। मराठी चित्रपट ,नाटके प्रसिद्ध, मनोरंजन करण्या झाली हो सिध्द। कथा,कादंबरी किती साहित्य प्रकार, नभातही न मावे असा आकार।   मराठी कलाकार तरीही का उपेक्षित, नाही रसिक जना हे अपेक्षित। इंग्रजी माध्यमच्या शाळा मुलांनी नटल्या, मराठी शाळा का सांगा आटल्या। धेडगुजरी होत आहे नवी पिढी, बोलतो इंग्रजी आता हरगडी। सारे शिक्षण,मुलाखती इंग्रजीतून, काय समजावे मुलांनी मराठीतून। द्यावा सरकार दरबारी मराठीस मान, तरच वाढेल आमुच्या भाषेची शान। द्यावा भाषेस अभिजात दर्जा, मराठी रसिकानो आता तरी गर्जा।।" --डॉ सुनिल विष्णू पाटील. ६८३,क,हिराकुंज,ए वॉर्ड ,शिवाजी  पेठ,कोल्हापूर-४१६०१२. मोबाइल-९८२२७७६२३६

Valentine day च्या निमित्ताने

 खरंतर valentine day कुणी काढला काय माहिती,पण ज्याने हा दिवस प्रथम साजरा केला त्याला प्रणाम। कारण आपल्या ज्या व्यक्ती लाडक्या आहेत त्यांना आठवण्याचा हा दिवस,ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांना आपल्या प्रेमाची आठवण करून  देण्याचा हा दिवस। प्रत्येकाची valentine व्यक्ती ही कुणीही असू शकते।कुणासाठी त्याची आई किंवा वडील ,तर कुणासाठी त्याची गर्लफ्रेंड अथवा पत्नी,तर कुणासाठी त्यांची मुले ही valentine असू शकतात।कुणासाठी मित्र मैत्रिणी ही valentine असू शकतात। पण माझ्यासाठी जीवनातला प्रत्येक दिवस जणू valentine day च आहे।कारण फक्त एकच दिवशी प्रेम दाखवून कसे चालेल।तुमच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही रोज ध्यानात ठेऊन त्यांना प्रेम दिले पाहिजे,त्यांच्याशी गोड  वागले पाहिजे असे मला वाटते। म्हणून रोजच valentine day असल्यासारखे जगा,मग बघा जगणे आणि सुंदर होऊन जाईल।           Happy valentine day...                  ..Dr sunil..

The white tiger..Film riview

               ।।द व्हाईट टायगर।।       A film review by dr sunil.. जंगलात वाघ खूप असतात पण व्हाईट टायगर अगदी दुर्मिळ।तसेच नोकर आणि मालक यांच्या वर्षानुवर्षे पिढीजात चालत आलेल्या या नात्यातही कधीतरी एखादा गुलाम हा वेगळा विचार करणारा असू शकतो,या रुढीतून बाहेर पडून स्वतः चे स्थान निर्माण करू शकतो,अश्या कथेवर आधारित कादंबरीवरुन हा चित्रपट घेतला आहे। प्रियांका चोप्राने प्रोड्युसर म्हणून वेगळा विषय निवडण्याचे धाडस केले आहे। अरविंद अडेगा ची कथा आणि रमीन बेहरणीची पटकथा आपल्याला खिळवून ठेवते। रमीन बेहरणी नि दिग्दर्शक म्हणून कथेला योग्य न्याय दिला आहे। अभिनयात आदर्श गौरव या नवख्या अभिनेत्याने बाजी मारली आहे।त्याचा बलराम हलवाई अगदी न विसरता येण्याजोगा।हा कलाकार नक्कीच आपले वेगळे स्थान निर्माण करेल यात शंकाच नाही। मालकाची भूमिका राजकुमार राव ने उत्तम निभावली आहे।तो खरच बॉलीवूडचा हिरा आहे। बाकी प्रियांका चोप्रा ला फारसे काम नाही पण तिने छान भूमिका निभावली आहे। ज्यांना comercial मसाला चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही।पण एक वेगळी थ्रि...
                ।। मास्टर ।। आज तब्बल 1 वर्षाने थिएटर ला सिनेमा पाहायचा योग आला ,कारण कोरोना मुळे अजून सगळीकडे सिनेमागृहे चालू नाहीत।। पण जगभर सध्या ज्या फिल्मने 250 करोड पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे तो चित्रपट म्हणजे 'मास्टर 'पाहिला आणि जणू action, acting आणि style ची मेजवानीच मिळाल्याचा आनंद झाला।। कैथी सारखा सुंदर थ्रिलर देणाऱ्या लोकेश कनगराज या दिग्दर्शकाचा हा चित्रपट मसाला मनोरंजन करण्यात पूर्णपणे यशस्वी होतो। ज्या रसिकांना थलपती विजय आणि विजय सेतूपती ही नावे माहीत आहेत त्यांनी हा चित्रपट आधीच पाहिला असेल। कारण थलपती विजय हा तामिळ मधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताआहे।रजनीकांत सारखे ज्याच्या style आणि manarism चे लोक दिवाने आहेत।ज्याचे थेरी,बिगील,मेर्सल सारखे चित्रपट गाजले आहेत।ज्याचे सर्व चित्रपट फक्त साऊथ मध्ये 200 कोटी चा व्यवसाय करतात असा हिरो आता पूर्ण जगभर प्रसिध्द आहे। थलपती विजय ने या फिल्म मध्ये ही त्याच्या नेहमीच्या style मध्ये खुप जबरदस्त अभिनय केला आहे।त्याचा डान्स,लकबी,अभिनय खरच लोकांना वेड लावतात।। विजय सेथुपती साऊथ मध्ये ए...