" दृश्यम 2 " A film review by dr sunil patil. दृश्यम आपण सर्वांनी पाहिला असेल आणि सर्वाना आवडला पण असेल। तर पुढे ही कथा आणखी कशी वळणे घेऊ शकते हे पहायचे असेल तर दृश्यम2 नक्की पाहावा लागेल।। पूर्वीच्या फिल्मचाच डायरेक्टर जितू जोसेफ ने या फिल्म मध्ये ही कमाल केली आहे।सुरुवातीचा अर्धा तास वगळता पूर्ण चित्रपट जागेवर खिळवून ठेवतो।खरेतर दृश्यम ही परिपूर्ण फिल्म होती।त्या नंतर पुढे ही काही घडू शकते हे अकल्पनिय होते।पण ही फिल्म आपल्या सर्व कल्पना मोडीत काढून एक उत्तम थ्रिलर म्हणून आपल्या पुढे येते। मोहनलाल हा मल्याळम चित्रपटाचा कोहिनूर आहे।त्याच्या अभिनय विषयी बोलावे तितके कमी।तो आपल्या सर्व भावना फक्त डोळ्यातून व्यक्त करतो। हिरोईन मीना ने ही छान अभिनय केला आहे। पटकथा खूप सशक्त आहे । पहिला अर्धा तास थोडा कंटाळवाणाआहे।आणि dubbing आर्टिस्ट चा आवाज इतका चांगला नाही। पण शेवटी एक सुंदर थ्रिलर पाहिल्याचे समाधान सर्वाना मिळेल यात शंका नाही। दृश्यम चा रिमेक 5 भाषे मध्ये झाला होता। दृश्यम 2 चा ही चालू आहे।हिंदी,तेलगू,कन्नड सर्व भाषेत ही फिल्म येईल। पण...
पोस्ट्स
मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे