पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Shershah ....Movie review

            "शेरशाह"  movie review by dr sunil .. धर्मा प्रॉडकशन आणि साऊथ डायरेक्टर विष्णू वर्धन ऍमेझॉन प्राईम वर 15 ऑगस्ट साठी एक सुंदर, देशभक्ती जागवणारी ,कारगिल युद्धातील परमवीर चक्र मिळवलेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वीरकथेवर आधारित फिल्म घेऊन आलेत। फिल्म 12 ऑगस्ट ला रिलीज झाली आहे।बऱ्याच दिवसांनी एक सुंदर देशभक्तीपर फिल्म पहावयास मिळाली। कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या व अफाट शौर्य गाजवलेल्या या खऱ्या हिरोची कथा पाहताना आपण खरेच हरवून जातो।उगाचच देशभक्तीचे डोस देणारे संवाद नाहीत की देशभक्ती पर गाणी नाहीत।सगळे काही समोर खरे घडत आहे अशी ही फिल्म आहे। युद्धाचे प्रसंग अगदी अंगावर वीरश्री आणणारे झाले आहेत। सिनेमॅटोग्राफी अति सुंदर,अकॅशन सीन्स जबरदस्त,पटकथा पर्फेक्ट,प्रोड्क्शन उच्च दर्जाचे आणि संगीत श्रवणीय आहे। सिद्धार्थ मल्होत्रा ने ही भूमिका अक्षरशः जगली आहे असे वाटावे इतका सुंदर अभिनय केला आहे।पहिली रोमँटिक भूमिका ते एक आर्मी ऑफिसर या साऱ्या छटा त्याने उत्तम सादर केल्या आहेत।हा रोल त्याच्या करिअर मधील बेस्ट रोल आहे यात शंका नसावी। कियारा...

BIGIL...MOVIE REVIEW

               ।  बिगिल  । 2019 चा थलपती विजय स्टारर बिगिल चित्रपट 'यु ट्यूब' वर पाहण्यात आला।। त्या वर्षीची 300 करोड व्यवसाय केलेली ही फिल्म नक्की बघावी अशीच आहे। एक गँगस्टर आणि त्याचा फुटबॉल खेळणारा मुलगा यांची ही अकॅशन आणि खेळ यानी सुंदर गुंफलेली कथा तुम्हाला खिळवून ठेवते। थलपती विजय ने दोन्ही रोल खूपच  जबरदस्त निभावले आहेत।त्याची अकॅशन,नृत्यकौशल्य,मॅनरिझम,अभिनय वेड लावतो।तो आज 1 नंबर चा पॅन इंडिया स्टार आहे यात शंकाच नाही। अलीकडे त्याचे चित्रपट पाहणे हा साऊथ च्या लोकांसाठी उत्सव च असतो। बाकी नयनतारा,जॅकी श्रॉफ आणि इतर सर्व कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे। अटली कुमार चे दिग्दर्शन मस्त आहे। सर्व अकॅशन सीन थरारक आहेत। तसेच फुटबॉल मॅचेस तुम्हाला चख दे इंडिया ची आठवण करून देतील।सिनेमॅटोग्राफी उत्तम,पटकथा आणि संवाद ही मस्त आहेत। ए आर रहमान चे संगीत श्रवणीय आहे। एक मस्त मास एंटरटेनर पाहिल्याचे समाधान हा चित्रपट देतो।। फक्त अलीकडे काही नवीन कंपन्या खराब डबिंग करत आहेत।या मुळे डब्बिंग इंडस्ट्री ला धोका आहे।मूळ फिल्मचा आनंद घेता येत नाही। त...