पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चंद्रिमा

                 "चंद्रिमा" एक चंद्र आकाशातला,  रोज उगवणारा । एक चंद्र मनातला कधी तरी डोकावणारा।। एक चंद्र कधी भरती तर कधी ओहोटी आणणारा, एक चंद्र मनातल्या भावनांचे हिंदोळे देणारा।। एक चंद्र कलेकलेने वाढणारा व कमी ही होणारा, एक चंद्र मनातला वाढतच जाणारा।। त्या चंद्राला असेल त्याच्या असण्याचा गर्व, माझ्या मनातल्या चंद्राला ही आहे अभिमान,त्याच्या अस्तित्वाचा।।      डॉ सुनील पाटील,कोल्हापूर।