"माझा फिल्मोनिया"
"माझा फिल्मोनिया" लोकांना डायबेटिस होतो ,बीपी होतो तसा मला फिल्मोनिया झालाय।तो ही अगदी लहान असल्यापासूनच। अगदी दुसरी तिसरीत असल्यापासून घरातल्या बरोबर थिएटर ला चित्रपट पाहायचा योग आला।तेव्हापासूनच या रोगाने मला पछाडले। लहानपणी थिएटरला जायचे प्रमाण क्वचितच असायचे ,त्यामुळे समाधान व्हायचे नाही।तरीही एखादा चांगला फायटिंग चा सिनेमा आला की मी नि माझा भाऊ पप्पांच्या मागे लागून तो सिनेमा पहायचोच।त्या वेळी आमच्या घरी एक पद्धत होती नवीन पाहुणे किंवा नवीन जोडपे घरी राहायला आले की त्यांना सिनेमा पाहायला घेऊन जायचे।त्या मुळे आम्ही सतत पाहुणे यायची वाट बघायचो।माझा हा आजार वाढण्याचे बीज येथेच होते। कोल्हापूर मध्ये शिव जयंती निमित्त रस्त्यावर मोठ्या पडद्यावर सिनेमे दाखवले जायचे।सातवी नंतर आम्ही सुट्टीत अश्या अनेक फिल्म्स पाहिल्या।अजून ही ते दिवस आठवून भारी वाटते।जुने अमिताभ ,धर्मेंद्र यांचे अनेक सिनेमे इथेच पाहिले।तसेच त्या वेळी भाड्याने VCR आणून ही खूप चित्रपट पाहिले।अनिल कपूर जॅकी श्रॉफ नि खूप एंटरटेन केले होते त्याकाळी। कॉलेज मध्य...