।। मास्टर ।।

आज तब्बल 1 वर्षाने थिएटर ला सिनेमा पाहायचा योग आला ,कारण कोरोना मुळे अजून सगळीकडे सिनेमागृहे चालू नाहीत।।

पण जगभर सध्या ज्या फिल्मने 250 करोड पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे तो चित्रपट म्हणजे 'मास्टर 'पाहिला आणि जणू action, acting आणि style ची मेजवानीच मिळाल्याचा आनंद झाला।।

कैथी सारखा सुंदर थ्रिलर देणाऱ्या लोकेश कनगराज या दिग्दर्शकाचा हा चित्रपट मसाला मनोरंजन करण्यात पूर्णपणे यशस्वी होतो।


ज्या रसिकांना थलपती विजय आणि विजय सेतूपती ही नावे माहीत आहेत त्यांनी हा चित्रपट आधीच पाहिला असेल।

कारण थलपती विजय हा तामिळ मधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताआहे।रजनीकांत सारखे ज्याच्या style आणि manarism चे लोक दिवाने आहेत।ज्याचे थेरी,बिगील,मेर्सल सारखे चित्रपट गाजले आहेत।ज्याचे सर्व चित्रपट फक्त साऊथ मध्ये 200 कोटी चा व्यवसाय करतात असा हिरो आता पूर्ण जगभर प्रसिध्द आहे।

थलपती विजय ने या फिल्म मध्ये ही त्याच्या नेहमीच्या style मध्ये खुप जबरदस्त अभिनय केला आहे।त्याचा डान्स,लकबी,अभिनय खरच लोकांना वेड लावतात।।


विजय सेथुपती साऊथ मध्ये एक उत्तम अभिनेता,गीतकार,

निर्माता,संवाद लेखक म्हणून प्रसिद्ध आहे।

ज्याचा 96 सर्वांनी u tube वर पहिला असेलच।

त्याचे सुपर डीलक्स,विक्रम वेधा ह्या फिल्म्स नक्की पाहायला हव्यात।ज्याचे डोळे साऱ्या भावना व्यक्त करतात,अजिबात style न करणारा असा हा अभिनेता सर्व क्रिटिक्स चा लाडका आहे।

त्याने ही भवानी हा थंड डोक्याचा व्हिलन खुपच खतरनाक आणि भाव खाऊन जाणारा सादर केलाय।।


हिरोईन मालविका मोहनन चे या मेजवाणीत स्वीट डिश इतकेच काम आहे।।

अर्जुन दास चा अभिनय ही मस्त ।

 चित्रपटातील गाणी श्रवणीय आहेत।पार्श्वसंगीत सतत पाय थिरकायला लावणारे आणि अंगावर काटा आणणारे आहे। 

अकॅशन सीन्स थरारक आणि टेस्टोस्टेरॉन वाढवणारे आहेत।।


त्यामुळे ज्या रसिकांना अकॅशनआणि मसाला  फिल्म्स आवडतात त्यांनी नक्की थिएटर ला पहावा  असा हा चित्रपट आहे।।


Riview by Dr, Sunil V Patil,kolhapur..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review