RRR review
" RRR "just don't miss it.. ' Film review by dr sunil मगधीरा,मख्खी आणि बाहुबली च्या प्रचंड यशानंतर एस एस राजामौली कडून नवीन काय येणार ,याची अधीरता व डायरेक्टर कडून अपेक्षा चाहत्यात खूपच मोठ्या प्रमाणात होत्या।त्या तब्बल 5 वर्षाच्या गॅप ने राजमौली नि RRR च्या रूपाने पूर्ण केल्या आहेत। एखाद्या उत्तम हॉटेल मध्ये गेल्यावर मस्त साग्रसंगीत पदार्थांनी भरलेली थाळी समोर यावी आणि कितीही खाल्ले तरी पोट भरते पण मन भरत नाही अशी काहीशी अवस्था ही फिल्म पाहिल्यावर झाली।। अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या 2 स्वातंत्र्य सैनिकावर आधारित के वि विजयेंद्र प्रसाद यांची फिकशनल कथा राजमौली नि इतक्या सुंदर व जबरदस्त रीतीने पटकथेत गुंफली आहे की पाहतच राहावे। लहान मुलांना आजी आजोबा कश्या कथा सांगत गुंगवून ठेवतात तसे राजमौली प्रेक्षकांना गुंगवून ठेवतात व आपल्याला त्यांच्या कल्पनेच्या जगाची सैर घडवून आणतात।। सिनेमाचा सगळ्यात महत्वाचा भाग त्याचे action sequeces आहेत।फक्त क्लायमॅक्स शूट करणेसाठी होलीवूड चा actoin...