पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुष्पा ..पार्ट 1 फिल्म रिव्ह्यू

                  "पुष्पा.. पार्ट 1 "       ।।फिल्म रिव्यु बाय डॉ सुनील पाटील।। आर्या फिल्म सर्वांनी पाहिली असेलच, 2004 साली या अल्लू अर्जुन च्या तेलगू फिल्मने कोल्हापूर मध्ये सिल्वर ज्युबिली केली होती। आता परत  हा सर्वांचा लाडका हिरो  परत एकदा कोल्हापूर मध्ये धुमाकूळ घालत आहे आपल्या नवीन कोऱ्या अश्या 'पुष्पा 'या फिल्म ने। डिरेक्टर 'सुकुमार' ने लाल चंदन तस्करीवर अशी काही फिल्म बनवली आहे की पाहतच राहावे।प्रत्येक दृश्य,अकॅशन सिन  त्याने भव्य दिव्य बनवला आहे।तेलगू ,कन्नड, तामिळ,मल्याळम आणि हिंदी अश्या 5 भाषेत ही फिल्म रिलीज करून त्याने भाषेतील अडसर ही दूर केलाय। अल्लू अर्जुन ने पुष्पा या चंदन तस्करची भूमिका अशी काही साकारली आहे की आपण विसरून जातो की अल्लू अर्जुन आहे।आपल्या समोर फक्त पुष्पराज च असतो।त्याचा अभिनय,श्रेयस तळपदेने दिलेला त्याचा आवाज,जबरदस्त संवाद ,अकॅशन ती ही खतरनाक स्टाईल मध्ये,मस्त डान्स सारे काही असे जमून आले आहे की ही भूमिका त्याच्या जीवनातील माईल स्टोन ठरेल यात शंकाच नाही।। बाकी 'रश्मीका मदाना 'ने ह...