पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"सूर्यवंशी "--review

           " सूर्यवंशी "         A film review by dr sunil.... काल करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच थिएटर मध्ये जाण्याचा योग घडवून आणला।कारण होते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारची नवी फिल्म सूर्यवंशी । खुप दिवसांनी थिएटर मध्ये शिट्ट्या,टाळया आणि दंगा ऐकून कान तृप्त झाले,डोळे भरून पावले। आपण परत नॉर्मल जीवन जगू शकतो याची खात्री झाली। 😊 अडीच तास कसे संपले ते कळलेच नाही। चित्रपटाची कथा अगदी साधी असली तरी पटकथा आणि संवाद जबरदस्त आहेत। रोहित शेट्टीने साहस दृश्यं अप्रतिम साकारली आहेत।अंगावर काटे आणणारे स्टंट थिएटर मधेच पाहायला हवेत। त्याचे दिग्दर्शन अफलातून आहे।प्रेक्षकाना विचार करायला तो वेळच देत नाही। अक्षय कुमार ने वीर सूर्यवंशी खूप टेरिफिक साकारला आहे।जसे रोहित शेट्टीचे ' सिंघम आणि simba वर्ल्ड फेमस आहेत ,तसेच वीर सूर्यवंशी ही होईल यात शंका नाही।अक्षयने कॉमेडी,इमोशन्स आणि स्टंटस तिन्ही पातळ्यांवर कमाल केली आहे। कतरीना कैफ ने मस्त काम केले आहे। तिचे 'टीप टीप बरसा पाणी'या गाण्यावरील नृत्य पाहताना रविना टंडन ची आठवण आल्याशिवाय राहत नाही। या अक...