पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

 ।। माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर ।। खरंतर फिल्मोनिया बरोबरच मला आणखी एका आजाराने पिडले आहे।तो म्हणजे लव्हेरिया। आता तुम्ही म्हणाल हे आणि काय नवीन।नवीन नाही जुनेच, ती हो आपली ताम्हणकरांची सई। लहानपणापासून श्रीदेवीच्या फिल्मच्या वाऱ्या करणारा मी,शर्मिला टागोर च्या खळीवर दिवाना असणारा मी ,जयश्री गडकरांचे सारे चित्रपट पाहणारा मी,रंजनांचा प्रचंड फॅन असणारा मी जेव्हा सई च्या प्रेमात पडतो तेव्हा तुमच्याही भुवया नक्की उंचावणार यात शंका नाही। पण मी सांगतो या बाकीच्या हीरॉइन्स माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या आणि सई माझ्या पेक्षा लहान आहे ,त्यामुळे हे घडले असावे। खरंतर तिचा 'सनई चौघडे' पाहिला आणि तिच्या ब्राह्मणी स्टाईल च्या बोलण्याने पार वेड लावले। पण जेव्हा तिची 'दुनियादारी'  पाहिली आणि शिरीन च्या एन्ट्री वर मी फ्लॅटच झालो। थिएटरमध्ये शेजारी सुंदर बायको असताना मी सई च्या प्रेमात पडत होतो ही जाणीवच वेगळी होती।तिने मोठा लाल गुलाब असलेला पांढरा शुभ्र ड्रेस घातला होता आणि डोळ्यावर मोठा गॉगल ।लाल कार मधून ती उतरली आणि थेट माझ्या हृदयात शिरली। मग तिचे संवाद असोत वा तिचे मधाळ हसू सारेच...

The family man 2

 " The Family man season 2" A review by Dr Sunil Patil kolhapur.. ज्यांनी फॅमिली मॅन चा पहिला season पाहिलाय त्यांनी दुसरा season रात्र रात्र जागून पाहिलाय यात शंका नाही। पण ज्यांनी पहिला नाही पाहिला त्यांच्या साठी सुद्धा ही वेब series नक्की पहावी अशीच आहे। आपला हिरो मनोज वाजपेयी खरंच एक फॅमिली मॅन आहे जो त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडता पडता हैरान झालाय ।पण त्याचे खरे रूप आहे एका हुशार स्पाय चे जो देशावर आलेली संकटे थोपवताना आपल्या जीवाचाही विचार करत नाही।आणि या वेळी संकट आहे ते इंटरनॅशनल तामिळ नक्षलवाद्याचे।श्रीलंकेतील आणि भारतातील राजकारणावर आधारित ही वेब सिरीज आपल्याला त्यातील प्रत्येक character सहित लक्षात राहील।कारण jk ,त्याची पोलीस मैत्रीण,फॅमिली मॅन ची पूर्ण फॅमिली,मुत्थु ही characters करणाऱ्या ऍक्टर नि मस्त अभिनय केला आहे। पण सगळ्यात मस्त आपला श्रीकांत तिवारी उर्फ मनोज वाजपेयी।आज त्याच्या इतका नैसर्गिक अभिनेता कुणी आहे का असा प्रश्न पडावा असा अभिनय केलाय भावाने।फॅमिली प्रॉब्लेम्स ने वैतागलेला पण फॅमिली वर जीवापाड प्रेम करणारा आणि एक हुशार agent या दोन्ही भ...