--"स्पंदन"--


"सरकार दरबारी घ्यावे आमचे निवेदन,

समजून घ्यावे मराठी रसिकांच्या मनीचे स्पंदन।।


भाषा आमुची फार हो थोर,

साऱ्या भाषांवर होई शिरजोर।

 

काय सांगू माझ्या मराठीचा तोरा,

जगभर तोंडी 'नाच रे मोरा'।


मराठी आमुची फार आहे गुणी,

किती सांगाव्या उखाणे आणि म्हणी।


मराठीचा आमच्या लै हो थाट,

बोलायला भाषा वाटे 

गुळमाट।

 

जपून ठेवलाय इतिहासाचा ठेवा,

पोवाडे ,गाणी किती लिहिलाय मेवा।


मराठी चित्रपट ,नाटके प्रसिद्ध,

मनोरंजन करण्या झाली हो सिध्द।


कथा,कादंबरी किती साहित्य प्रकार,

नभातही न मावे असा आकार।

 

मराठी कलाकार तरीही का उपेक्षित,

नाही रसिक जना हे अपेक्षित।


इंग्रजी माध्यमच्या शाळा मुलांनी नटल्या,

मराठी शाळा का सांगा आटल्या।


धेडगुजरी होत आहे नवी पिढी,

बोलतो इंग्रजी आता हरगडी।


सारे शिक्षण,मुलाखती इंग्रजीतून,

काय समजावे मुलांनी मराठीतून।


द्यावा सरकार दरबारी मराठीस मान,

तरच वाढेल आमुच्या भाषेची शान।


द्यावा भाषेस अभिजात दर्जा,

मराठी रसिकानो आता तरी गर्जा।।"



--डॉ सुनिल विष्णू पाटील.

६८३,क,हिराकुंज,ए वॉर्ड ,शिवाजी  पेठ,कोल्हापूर-४१६०१२.

मोबाइल-९८२२७७६२३६

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review