Shershah ....Movie review
"शेरशाह"
movie review by dr sunil ..
धर्मा प्रॉडकशन आणि साऊथ डायरेक्टर विष्णू वर्धन ऍमेझॉन प्राईम वर 15 ऑगस्ट साठी एक सुंदर, देशभक्ती जागवणारी ,कारगिल युद्धातील परमवीर चक्र मिळवलेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वीरकथेवर आधारित फिल्म घेऊन आलेत।
फिल्म 12 ऑगस्ट ला रिलीज झाली आहे।बऱ्याच दिवसांनी एक सुंदर देशभक्तीपर फिल्म पहावयास मिळाली।
कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या व अफाट शौर्य गाजवलेल्या या खऱ्या हिरोची कथा पाहताना आपण खरेच हरवून जातो।उगाचच देशभक्तीचे डोस देणारे संवाद नाहीत की देशभक्ती पर गाणी नाहीत।सगळे काही समोर खरे घडत आहे अशी ही फिल्म आहे।
युद्धाचे प्रसंग अगदी अंगावर वीरश्री आणणारे झाले आहेत।
सिनेमॅटोग्राफी अति सुंदर,अकॅशन सीन्स जबरदस्त,पटकथा पर्फेक्ट,प्रोड्क्शन उच्च दर्जाचे आणि संगीत श्रवणीय आहे।
सिद्धार्थ मल्होत्रा ने ही भूमिका अक्षरशः जगली आहे असे वाटावे इतका सुंदर अभिनय केला आहे।पहिली रोमँटिक भूमिका ते एक आर्मी ऑफिसर या साऱ्या छटा त्याने उत्तम सादर केल्या आहेत।हा रोल त्याच्या करिअर मधील बेस्ट रोल आहे यात शंका नसावी।
कियारा अडवाणीने ही मस्त अभिनय केलाय।जिमी चा रोल केलेल्या शिव पंडित ने छोट्या रोल मध्ये ही कमाल केली आहे।सपोर्ट कास्ट ने उत्तम काम केलंय।।
विष्णू वर्धन ने उत्तम दिग्दर्शन केले आहे।
17000 फूट उंचीवर असलेल्या शत्रू ला तिथून घालवून युद्ध संपवले होते आपल्या आर्मी ने।यात विक्रम बत्रा नि आपल्या शौर्याने विजय खेचून आणला होता म्हणून 26 जुलै हा कारगिल
विजय दिवस म्हणून साजरा केला जातो।
फिल्मचा शेवट पाहताना आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही।
सर्वांनी आपल्या सर्व फॅमिली सहित नक्की बघावी अशी ही फिल्म आहे।
----डॉ सुनील पाटील,कोल्हापूर----
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा