BIGIL...MOVIE REVIEW

               ।  बिगिल  ।

2019 चा थलपती विजय स्टारर बिगिल चित्रपट 'यु ट्यूब' वर पाहण्यात आला।।

त्या वर्षीची 300 करोड व्यवसाय केलेली ही फिल्म नक्की बघावी अशीच आहे।

एक गँगस्टर आणि त्याचा फुटबॉल खेळणारा मुलगा यांची ही अकॅशन आणि खेळ यानी सुंदर गुंफलेली कथा तुम्हाला खिळवून ठेवते।

थलपती विजय ने दोन्ही रोल खूपच  जबरदस्त निभावले आहेत।त्याची अकॅशन,नृत्यकौशल्य,मॅनरिझम,अभिनय वेड लावतो।तो आज 1 नंबर चा पॅन इंडिया स्टार आहे यात शंकाच नाही।

अलीकडे त्याचे चित्रपट पाहणे हा साऊथ च्या लोकांसाठी उत्सव च असतो।

बाकी नयनतारा,जॅकी श्रॉफ आणि इतर सर्व कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे।

अटली कुमार चे दिग्दर्शन मस्त आहे।

सर्व अकॅशन सीन थरारक आहेत।

तसेच फुटबॉल मॅचेस तुम्हाला चख दे इंडिया ची आठवण करून देतील।सिनेमॅटोग्राफी उत्तम,पटकथा आणि संवाद ही मस्त आहेत।

ए आर रहमान चे संगीत श्रवणीय आहे।

एक मस्त मास एंटरटेनर पाहिल्याचे समाधान हा चित्रपट देतो।।

फक्त अलीकडे काही नवीन कंपन्या खराब डबिंग करत आहेत।या मुळे डब्बिंग इंडस्ट्री ला धोका आहे।मूळ फिल्मचा आनंद घेता येत नाही।

तरीही ही फिल्म आवडेल यात शंका नाही।

   --- डॉ सुनिल पाटील ,कोल्हापूर..








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review