लिओ....मूवी रिव्यू.
"लिओ -ब्लडी स्वेट "
'मूवी रिव्यू बाय डॉ सुनिल पाटील'
'लोकेश कनगराज'.. नाम ही काफी है...
मास्टर, कैथी, विक्रम सारखे अफलातून ऍक्शन थ्रीलर बनवणाऱ्या डायरेक्टर चा नवा कोरा चित्रपट -लिओ.
कैथी, विक्रम नंतर त्या युनिव्हर्सची तिसरी फिल्म.
या वेळी त्याने A history of voliolence या हॉलिवूड च्या फिल्म चा आधार घेऊन एक जबरदस्त ऍक्शन थ्रीलर फिल्म बनवली आहे.
'विजय थलपती' च्या करिअर मधील सर्वात हिट फिल्म, पहिल्या दिवशी वर्ल्डवाईड सर्वात जास्त कमाई करणारी मूवी पहिल्या 5 दिवसात 500 करोड चा व्यवसाय करून साऊथ चा डंका जगभर वाजवत आहे.
फिल्म ची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील ऍक्शन सिकवेंसेस.
हैना बरोबरचा पहिला सिकवेन्स असो वा त्या नंतरचा कॅफे मधील सिकवेन्स....पाहताना आपले काळीज जणू आपल्या हातात येईल असे वाटते.
तसेच कार सिकवेन्स पाहताना आपण हॉलिवूड ची फिल्म पाहतोय असा भास होतो.
सर्व ऍक्शन सिकवेन्सेस बाप लेवल चे आहेत. काही तर तुम्ही इंडियन फिल्म मध्ये कधी पाहिले नसतील.
स्टंट डायरेक्टर 'Anbariv' ने अफलातुन काम केले आहे.
त्या बरोबर सिनेमाटोग्राफी 'मनोज परमहंस' यांची आहे.स्टंट्स च्या वेळचे कॅमेरा वर्क पाहून हॉलिवूड वाल्यानी तोंडात बोटे घातली पाहिजेत.
या बरोबर साऊथ चे आणखी एक महत्वाचे नाव म्हणजे 'अनिरुद्ध'.
Music खूप मस्त आणि बॅग्राऊंड music मध्ये त्याची मास्टरी आहे.पूर्ण फिल्म त्याच्या बॅग्राऊंड music वर आपले पाय टॅप करत राहतात.
लोकेश कनगराज चे दिग्दर्शन खूप च भारी... त्याने असे थ्रीलर बनवत राहावे आणि आम्ही पाहत राहावे असे वाटते.
अश्या फिल्म मध्ये अभिनय खुप महत्वाचा ठरतो.
आपला 'संजू बाबा' ने परत एकदा मस्त व्हिलन साकारलाय.
'अर्जुन' चा व्हिलन ही नाद खुळा.
'त्रिशा' ने हिरोईन ची भूमिका छान केली आहे. बाकीच्या कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.
पण.. पण.. 'विजय 'ला थलपती का म्हणतात हे जाणून घायचे असेल तर ही फिल्म बघा.
पार्थिवन आणि लिओ दोन्ही भूमिकेत त्याने जान ओतलीय.
मॅनरिझम साठी प्रसिद्ध असलेल्या या हिरो ने अप्रतिम अभिनय केलाय.. तुम्ही त्याचे फॅन नसला तरी तो तुमच्या मनात स्थान निर्माण करेल यात शंका नाही.
ज्यांना ऍक्शन आवडते त्या सर्वासाठी must watch movie आहे. नक्की पहा 👍.
Film review by Dr Sunil Patil, kolhapur.
Best
उत्तर द्याहटवा