"जिम चं आख्यान "
खरंतर जिम ला का जायचे हा मला पूर्वी प्रश्न पडायचा. कारण घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलण्याचा प्रकार असच मला वाटायचं.
पण काही कारणानी जिम जॉईन केली. जॉईन केल्यावर अनेक प्रकारचे लोक जिम करताना दिसले.
त्यात सकाळी 6 ते 9 पर्यंत येणारे, फिटनेस ला जपणारे,प्रचंड व्यायाम करणारे,डाएट करणारे ही खूप असतात. त्यात सिक्स पॅक साठी खूप जन प्रयत्न करतात पण नंतर त्यांच्या लक्षात येते कि हे आपले काम न्हवे 😃.
काही जण रात्री खाल्ले पिलेले जिरवाण्यासाठी येतात😃, तर काही शुगर बीपी कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी डॉ नी सल्ला दिला म्हणून 👍.
काही जणांना व्यायामापेक्षा गप्पा मारण्यात समाधान कारण त्या मुळे त्यांचा पुढचा दिवस आनंदात जातो😊👍.
काही जण खूप व्यायाम करतात पण डाएट च्या नावाने बोंब 😜.त्यामुळे त्यांची पोटे काही दिवस कमी तर काही दिवस सुटलेली असतात😃.
काही जण फक्त
कार्डीयो करतात कारण वजन उचलण्यावर त्यांचा विश्वास नसतो 🤓.
काही जण फक्त वेट ट्रेनिंग करतात.
काही जण ट्रेड मिलवर डोंगर चढल्यासारखे चालतात तर काही इतके हळू कि रांगणारे बाळ ही त्यांच्या पुढे जाईल😃.
काही जण 10 नंतर येतात, खरंतर दुपारी 10 ते 5 ही व्यायामाची वेळ चं न्हवे पण त्यांनाच वेळ नसतो 😃..
काही जण मिसळ पार्टी तर काही बिर्याणी ग्रुप, तर कधी जेवणाचा बेत करतात आणि आयुष्यभर भरपूर खाऊन जमेल तितका व्यायाम करायचे ठरवतात 😃.
काही जनांचा डाएट बघून त्या खर्चात एका फॅमिली च्या जेवणाचा खर्च भागेल असे वाटते.
काही जण अगदी परफेक्ट व्यायाम करतात तर काही अजूनही शिकत असतात😃
(माझ्यासारखे ).
काही काही थोडे दिवस येतात परत सुट्टी घेतात... पंढरीची वारी केल्यासारखी पण काही जण येतात.पन जेव्हा परत येतात तेव्हा ओळखणे अवघड जाते 😃.
अश्या अनेक तऱ्हेचे लोक जिम मध्ये भेटतात..
पण सर्व जण एकत्र व्यायाम केल्यामुळे, गप्पा मारल्यामुळे थोडे का होईना सर्वाना च याचा फायदा होतो. अगदी जिम च्या मालकांचा सुद्धा 😃🙏.
विनोदासाठी लिहिले आहे त्यामुळे nothing personal 🙏
Dr Sunil patil.
Kolhapur.
खरंच जिम म्हणजे जम्माडी जंमत असते सगळे प्रकार बघायला मिळतात....छान! अचूक निरीक्षण केलंय.
उत्तर द्याहटवा