"ब्रह्मास्त्र "..फिल्म रिव्ह्यू
"ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा....फिल्म रिव्ह्यू "
By Dr Sunil Patil ,kolhapur.
खूप दिवसांनी बॉलीवूड ची फिल्म फर्स्ट डे बघितली।
ब्रह्मस्त्र ची चर्चा आणि हवा खूप झाली होती।
त्यात सध्या कोणतीच बॉलीवूड फिल्म चालत नाही आहे।त्या मुळे ही फिल्म नक्की छान असेल अशी आशा होती आणि फिल्मही तशीच आहे।
पूर्ण फॅमिली ला, लहान थोरांना आवडेल अशीच आहे ही फिल्म।
अयान मुखर्जी ने 8 वर्षे घालवली ही फिल्म बनवायला आणि त्याची मेहनत दिसून येते।
ब्रह्मस्त्र पार्ट 1 शिवा ...ही 3 भागातील पहिला भाग आहे ।तरीही एक पूर्ण कथा आहे ।कुठेही अर्धे काही पाहिल्याचे दुःख होत नाही आणि दुसऱ्या भागाची आतुरता लागून राहते।
दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जी ने कमाल केली आहे।त्याने ब्रह्मस्त्र चे वेगळे जग तयार केले आहे त्यावर आपला विश्वास बसने भाग पडते।
पटकथा,संवाद,स्टोरी फारशी क्लिष्ट नसून अगदी सर्वाना समजेल अशी आहे।
Vfx आणि animation हॉलिवूड च्या तोडीचे झाले आहे।
Action sequences थरारक आहेत।
शाहरुख खान चा 10 मिनिटांचा गेस्ट apperance खूप जबरदस्त झाला आहे।बॉलीवूड चा बादशहा स्क्रीन वर आल्यावर शिट्टी तोंडात येतेच।
नागर्जूनचा छोटासा पण महत्वाचा रोल सर्वाना नक्कीच आवडेल।
अमिताभ बच्चन चा 'गुरुजी' चा रोल नेहमीप्रमाणे मस्त झाला आहे।बॅकग्राऊंड ला त्यांचा आवाज चित्रपटाची उंची वाढवतो।
अभिनयात रणबीर आणि आलिया ने आपल्या केमिष्ट्री ने जान आणली आहे।
रणबीर चा सुरूवातीचा थोडासा भांबावलेला पण नंतर आपल्या शक्तीची जाणीव झालेला शिवा मस्त जमला आहे।
आलिया भट्ट अभिनयात खूप वरच्या लेवल ला आहे।गंगुबाई ,darlings आणि आता ब्रह्मास्त्र सलग हैट्रिक करून ती आज टॉप ला पोहोचली आहे।
मौनी रॉय ची विलन 'जुनुन'खूपच खतरनाक झाली आहे।
प्रीतम ची गाणी आधीच हिट झाली आहेत।ती पडद्यावर बघताना ही मजा येते।।
आपण हॉलिवूड चे इमोशन नसलेले फक्त अकॅशन चित्रपट पाहायला गर्दी करतो।
या आपल्या अस्सल मातीतील फिल्म मध्ये अकॅशन,इमोशन,लव्ह स्टोरी,उत्तम vfx आणि animation ,जबरदस्त अभिनय ,सुंदर संगीत, mythological story सारे काही आहे।
तर एकदा आपल्या लहानग्यांना घेऊन जायला हरकत नाही ही फिल्म पाहायला।
best
उत्तर द्याहटवा