Vikram hit list...review

             "विक्रम हिटलिस्ट"

        Review by dr sunil..

कमल हसन चा नवीन सिनेमा खूप दिवसांनी आलाय म्हणल्यावर थेटर ला जाण्याचा योग घडवून आणला।

लोकेश कनकराज लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट कमल हसन ने स्वतः प्रोड्युस केला आहे।

कमल हसनच्याच 1986 च्या 'विक्रम' चा उल्लेख या फिल्म मध्ये घेतला आहे।

त्या फिल्म चे title ट्रॅक याही फिल्म मध्ये अतिशय सुंदर रीतीने वापरले आहे।अनिरुद्ध ने प्रत्येक हिरो आणि व्हिलन साठी वेगळे backround music वापरले आहे।प्रत्येक सिन साठी ,रोलेक्स च्या एन्ट्री साठी ,title आणि इंटरवल चे music pieces तर खरेच खूप श्रवणीय आणि वेगळे आहेत,ज्यामुळे फिल्म एका वेगळ्या उंचीवर पोहोचते।।

दिग्दर्शन अप्रतिम आहे।ज्यांनी लोकेश चा कैथी पाहिला असेल त्यांना याची झलक नक्कीच आली असेल।प्रत्येक हिरो ला त्याची आवश्यक ती space देऊन तो त्याच्या चित्रपटाची  कथा पुढे नेत राहतो।त्याची थ्रिलर या माध्यमावर जबरदस्त पकड आहे ।

अभिनयाविषयी बोलायचे तर कमल हसन यांच्या पासून च जणू अभिनय सुरू झाला असे म्हणावे लागेल।आज ही सर्वात जास्त फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्ड यांच्याच नावावर आहेत।खुपच अविस्मरणीय अनुभव मिळतो त्याची ही फिल्म पाहताना।

फहाद फासील ह्या नव्या अभिनेत्याला नवीन कमल हसन का म्हणतात हे ही फिल्म पाहिल्यावर लक्षात येते।जबरदस्त अभिनय केलाय याने ही।

विजय सेतुपती फक्त नावच बास आहे।त्याने व्हिलन ,त्याच्या छटा अप्रतिम साकारल्या आहेत।

सूर्या हा अभिनेता शेवटची फक्त 5 मिनिटे येतो आणि पुऱ्या फिल्मवर त्याची छाप सोडून जातो।

इतक्या कमी स्क्रीन space मध्ये चुकूनच एकाद्या हिरो ने हे साध्य केले असेल।

फिल्मची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे।

अकॅशन सिक्वेन्स खूप टेरिफिक झाले आहेत।

यातील गन मशीन चा सिन आता पर्यंत च्या सर्व गन मशीन सिन मधला बाप ठरावा अगदी kgf 2 मधील सिन पेक्षाही।

ज्यांना अश्या प्रकारचे अकॅशन थ्रिलर फिल्म आवडतात,ज्यांना कमल हसन आवडतो त्या सर्वांसाठी ही फिल्म एका मेजवानी पेक्षा नक्किच कमी नाही।

2 आठवड्या मध्ये जगभरात ह्या फिल्म ने 330  करोड चा व्यवसाय केला आहे।।

    ...Dr Sunil V Patil, kolhapur...








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review