RRR review

            " RRR "just don't miss it..

           ' Film review by dr sunil

मगधीरा,मख्खी आणि बाहुबली च्या प्रचंड यशानंतर एस एस राजामौली कडून नवीन काय येणार ,याची अधीरता व डायरेक्टर कडून अपेक्षा चाहत्यात खूपच मोठ्या प्रमाणात होत्या।त्या तब्बल  5 वर्षाच्या गॅप ने राजमौली नि RRR च्या रूपाने पूर्ण केल्या आहेत।

एखाद्या उत्तम हॉटेल मध्ये गेल्यावर मस्त साग्रसंगीत पदार्थांनी भरलेली थाळी समोर यावी आणि कितीही खाल्ले तरी पोट भरते पण मन  भरत नाही अशी काहीशी अवस्था ही फिल्म पाहिल्यावर झाली।।

अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या 2 स्वातंत्र्य सैनिकावर आधारित के वि विजयेंद्र प्रसाद यांची फिकशनल कथा राजमौली नि इतक्या सुंदर व जबरदस्त रीतीने पटकथेत गुंफली आहे की पाहतच राहावे। लहान मुलांना आजी आजोबा कश्या कथा सांगत गुंगवून ठेवतात तसे राजमौली प्रेक्षकांना गुंगवून ठेवतात व आपल्याला त्यांच्या कल्पनेच्या जगाची सैर घडवून आणतात।।

सिनेमाचा सगळ्यात महत्वाचा भाग त्याचे action sequeces  आहेत।फक्त क्लायमॅक्स शूट करणेसाठी होलीवूड चा actoin director निक पॉवेल ला बोलावले होते।त्याचे फलित म्हणजे शेवटचा अर्धा पाऊण तास आपण डोळ्याची पापणीही लवत नाही,सीट च्या कडेवर बसून राहतो।शिट्या आणि दंगा शेवटच्या गाण्यापर्यत चालू होता।।

जिथे आपल्या कल्पना संपतात तिथे राजमौलींच्या सुरू होतात हे प्रत्येक सिन बघताना वाटत राहते।

राम चरण तेजा आणि ज्युनिअर ntr या दोघांनी आपल्या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत।या त्यांच्या करिअर मधील सर्वोत्तम भूमिका ठरतील।अकॅशन,इमोशन,अभिनय सर्वच पातळीवर त्यांनी कमाल केली आहे।

त्यांच्या' नाचो नाचो 'गाण्याला सारे थेटर लोकांनी डोक्यावर घेतले होते।दोघांचे नृत्य कौशल्य वादातीत आहे।

त्यांच्या स्टारडम विषयी इतकेच सांगेन की फक्त तेलगू मध्ये 1st डे चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 cr झाले आहे।जगभरात फिल्मने पहिल्या दिवशी 240 करोड चा व्यवसाय केला आहे।

चित्रपटाने pre release  450 cr चा व्यवसाय करून सर्व रेकॉर्ड मोडीत काढली आहेत।।

अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी आपल्या भूमिकेत छान रंग भरले आहेत।

ओलिव्हिआ मॉरिस आणि रे स्टीवन्सन ही उत्तम।

राजमौलिनी काही सीन्स इतके टेरिफिक घेतले आहेत की विचारू नका।दोन्ही हिरोची एन्ट्री सिन,शेवटचा क्लायमॅक्स नाद खुळा झाला आहे।भीम फक्त काही लोकांसोबत शेकडो इंग्रजांवर हल्ला करतो तो सिन आपण कल्पना करू शकत नाही असा झाला आहे ।फक्त आपले तोंड वासले जाते। असा सिन आजपर्यत तुम्ही पाहिला नसेल।।

राजमौली चे दिग्दर्शन बाहुबलीच्या तोडीचे झाले आहे।पटकथा ,संवाद अप्रतिम लिहिले आहेत।

के के सेंथील कुमार यांची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे।सगळ्याच फ्रेम्स खुपच सुंदर झाल्या आहेत।

एम एम किरवानी याचे संगीत उत्तम आहे ।पण पार्श्वसंगीत हॉलीवूड च्या तोडीस तोड आहे।।

एकूणच ही फिल्म सर्व रसिकांनी आपल्या कुटूंबीय सोबत पहावि व एक सोहळा एन्जॉय करावा।कारण ही आपल्या मातीतील फिल्म आहे जी जगभर  गाजत आहे।


शेवटी एवढेच सांगेन की हॉलिवूड ला स्पिलबर्ग आहेत तर आपल्या कडे एस एस राजमौली।।


       ..Review by dr sunil patil, kolhapur....




       

टिप्पण्या

  1. समीक्षा उत्तम! बघायला पाहिजे चित्रपट!👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review