"सूर्यवंशी "--review
" सूर्यवंशी "
A film review by dr sunil....
काल करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच थिएटर मध्ये जाण्याचा योग घडवून आणला।कारण होते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारची नवी फिल्म सूर्यवंशी ।
खुप दिवसांनी थिएटर मध्ये शिट्ट्या,टाळया आणि दंगा ऐकून कान तृप्त झाले,डोळे भरून पावले।
आपण परत नॉर्मल जीवन जगू शकतो याची खात्री झाली। 😊
अडीच तास कसे संपले ते कळलेच नाही।
चित्रपटाची कथा अगदी साधी असली तरी पटकथा आणि संवाद जबरदस्त आहेत।
रोहित शेट्टीने साहस दृश्यं अप्रतिम साकारली आहेत।अंगावर काटे आणणारे स्टंट थिएटर मधेच पाहायला हवेत।
त्याचे दिग्दर्शन अफलातून आहे।प्रेक्षकाना विचार करायला तो वेळच देत नाही।
अक्षय कुमार ने वीर सूर्यवंशी खूप टेरिफिक साकारला आहे।जसे रोहित शेट्टीचे ' सिंघम आणि simba वर्ल्ड फेमस आहेत ,तसेच वीर सूर्यवंशी ही होईल यात शंका नाही।अक्षयने कॉमेडी,इमोशन्स आणि स्टंटस तिन्ही पातळ्यांवर कमाल केली आहे।
कतरीना कैफ ने मस्त काम केले आहे।
तिचे 'टीप टीप बरसा पाणी'या गाण्यावरील
नृत्य पाहताना रविना टंडन ची आठवण आल्याशिवाय राहत नाही।
या अकॅशन चित्रपटात कतरीना ने स्वीट डिश ची कमतरता भरून काढली आहे।
रणवीर सिंग चा cameo simbaa
खूपच मजेदार झालाय।अजय देवगन चा सिंघम नेहमीप्रमाने --नाद खुळा ।
हे दोघे शेवटी अर्धा तास येतात।आणि तिघे मिळून पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घालतात।
स्टार पॉवर काय असते ते थिएटर मधेच कळते।
बाकी सर्व negative character साकारणाऱ्या कलाकारानि खूप जबरदस्त अभिनय केलाय।
फिल्मची गाणी आधीच हिट झाली आहेत।फिल्म संपताना शेवटचे गाणे या तीन स्टार वर चित्रित करून रोहित ने दिवाळी बोनस दिला आहे।
सगळ्यात भारी backround music ने चित्रपट थरारक बनवलाय।
करोना मुळे मृत पडलेल्या बॉलीवूड ला संजीवनी द्यायचे काम रोहित शेट्टी आणि टीम ने केले आहे याबद्धल त्यांचे धन्यवाद।
जादा विचार न करता दिवाळी चा श्रम परिहार म्हणून हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघायला हवा।।
---------डॉ सुनील पाटील ,कोल्हापूर-----------
Wah!!!
उत्तर द्याहटवाNice review, will watch it..
उत्तर द्याहटवाMast... Jayala lagatay
उत्तर द्याहटवा