चंद्रिमा

                 "चंद्रिमा"

एक चंद्र आकाशातला, 

रोज उगवणारा ।

एक चंद्र मनातला कधी तरी डोकावणारा।।

एक चंद्र कधी भरती तर कधी ओहोटी आणणारा,

एक चंद्र मनातल्या भावनांचे हिंदोळे देणारा।।

एक चंद्र कलेकलेने वाढणारा व कमी ही होणारा,

एक चंद्र मनातला वाढतच जाणारा।।

त्या चंद्राला असेल त्याच्या असण्याचा गर्व,

माझ्या मनातल्या चंद्राला ही आहे अभिमान,त्याच्या अस्तित्वाचा।।


     डॉ सुनील पाटील,कोल्हापूर।

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review