The family man 2

 " The Family man season 2"

A review by Dr Sunil Patil kolhapur..

ज्यांनी फॅमिली मॅन चा पहिला season पाहिलाय त्यांनी दुसरा season रात्र रात्र जागून पाहिलाय यात शंका नाही।

पण ज्यांनी पहिला नाही पाहिला त्यांच्या साठी सुद्धा ही वेब series नक्की पहावी अशीच आहे।

आपला हिरो मनोज वाजपेयी खरंच एक फॅमिली मॅन आहे जो त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडता पडता हैरान झालाय ।पण त्याचे खरे रूप आहे एका हुशार स्पाय चे जो देशावर आलेली संकटे थोपवताना आपल्या जीवाचाही विचार करत नाही।आणि या वेळी संकट आहे ते इंटरनॅशनल तामिळ नक्षलवाद्याचे।श्रीलंकेतील आणि भारतातील राजकारणावर आधारित ही वेब सिरीज आपल्याला त्यातील प्रत्येक character सहित लक्षात राहील।कारण jk ,त्याची पोलीस मैत्रीण,फॅमिली मॅन ची पूर्ण फॅमिली,मुत्थु ही characters करणाऱ्या ऍक्टर नि मस्त अभिनय केला आहे।

पण सगळ्यात मस्त आपला श्रीकांत तिवारी उर्फ मनोज वाजपेयी।आज त्याच्या इतका नैसर्गिक अभिनेता कुणी आहे का असा प्रश्न पडावा असा अभिनय केलाय भावाने।फॅमिली प्रॉब्लेम्स ने वैतागलेला पण फॅमिली वर जीवापाड प्रेम करणारा आणि एक हुशार agent या दोन्ही भूमिका तो इतक्या लीलया साकारतो की पाहतच राहावे।

त्याच्या  दोन्ही भूमिका मनाला भिडतात आणि पटतात पण ।हे फक्त तोच करू जाणे।

आणि या वेळी त्याला सोबत मिळाली आहे साऊथ च्या एका सुंदर आणि हुशार अभिनेत्री सामंता अक्कीनेनी ची।जी नागार्जुन ची सून आहे।

यात तिला एक काळी सावळी साधी मुलगी दाखवली आहे।तिला खुप कमी संवाद आहेत।पण ती फक्त डोळ्यांनीच तिचे काम करते।

सुरुवातीला साधी वाटनारी ती एक trained agent आहे जी आपल्या देशात एक खतरनाक मिशन वर आली आहे। आपल्या समोरच्या शत्रूला डोळ्याची पापणी लवते न लवते तो वर यम सदनाला पाठवणारी ,आपल्या मिशन शी जीव गेला तरी प्रामाणिक राहणारी 'राजी' तिने अशी काही रंगवली की सिरीज संपल्यावर आपण सामंता ला विसरून फक्त राजी लक्षात ठेवतो।तिच्या इतकी खतरनाक अकॅशन कुणीच केली नाही या सिरीज मध्ये।

फक्त 30 टक्के संवाद तामिळ आहेत जे subtitiles वरून समजतील ।आणि पहिल्या season शी compare न करता ही सिरीज बघायला हवी।

बाकी स्टोरी,थ्रिल ,पटकथा direction background music जबरदस्त आहे।।

या लौकडाऊन च्या काळात फॅमिली मॅन आपल्याला नक्की आवडेल असाच आहे।

आता त्याचा तिसरा season ही नक्की येईल।।

   ---डॉ सुनील पाटील ,कोल्हापूर---



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review