माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर
।। माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर ।।
खरंतर फिल्मोनिया बरोबरच मला आणखी एका आजाराने पिडले आहे।तो म्हणजे लव्हेरिया।
आता तुम्ही म्हणाल हे आणि काय नवीन।नवीन नाही जुनेच, ती हो आपली ताम्हणकरांची सई।
लहानपणापासून श्रीदेवीच्या फिल्मच्या वाऱ्या करणारा मी,शर्मिला टागोर च्या खळीवर दिवाना असणारा मी ,जयश्री गडकरांचे सारे चित्रपट पाहणारा मी,रंजनांचा प्रचंड फॅन असणारा मी जेव्हा सई च्या प्रेमात पडतो तेव्हा तुमच्याही भुवया नक्की उंचावणार यात शंका नाही।
पण मी सांगतो या बाकीच्या हीरॉइन्स माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या आणि सई माझ्या पेक्षा लहान आहे ,त्यामुळे हे घडले असावे।
खरंतर तिचा 'सनई चौघडे' पाहिला आणि तिच्या ब्राह्मणी स्टाईल च्या बोलण्याने पार वेड लावले।
पण जेव्हा तिची 'दुनियादारी' पाहिली आणि शिरीन च्या एन्ट्री वर मी फ्लॅटच झालो।
थिएटरमध्ये शेजारी सुंदर बायको असताना मी सई च्या प्रेमात पडत होतो ही जाणीवच वेगळी होती।तिने मोठा लाल गुलाब असलेला पांढरा शुभ्र ड्रेस घातला होता आणि डोळ्यावर मोठा गॉगल ।लाल कार मधून ती उतरली आणि थेट माझ्या हृदयात शिरली।
मग तिचे संवाद असोत वा तिचे मधाळ हसू सारेच मला आवडू लागले।आता तुम्ही म्हणाल मधाळ म्हणजे नक्की काय।ती हसल्यावर चुटुक करून चमचाभर मध तिच्या ओठातून सांडतो की काय असे वाटायचे।
"समोर कॅटबरी असताना हातातले बिस्किट ही तुला सोडवत नाही" असे म्हणणारी सई डोळ्यासमोरून अजून ही हलत नाही।
'प्यारवाली लव्हस्टोरी' मी फक्त तिच्यासाठी पाहिला। तिचे 'गुरू पौर्णिमा','वजनदार','टाइम प्लीज','धागेदोरे','पुणे 52' ,'हंटर',धुरळा'सारखे अनेक चित्रपट पाहिले।या चित्रपटात इतके कलाकार असूनही माझे लक्ष फक्त सईकडे च असायचे।कोणताही रोल ती इतक्या सहजतेने करते की तिला फार कष्ट घ्यावे लागले असतील असे वाटत नाही।classmate फिल्म मधील "चड्डीत राहायचं हं " सारखे तिचे अनेक संवाद गाजले।
आणखी महत्वाचे सांगायचे म्हणजे तिच्या बोल्ड भूमिका।हंटर मधील तिची भाभी असो वा नो एन्ट्री तील आख्खे गाणे बिकिनीत सादर करणारी सई, तिच्या कोणत्याही रूपाने माझ्या मनावर गारुड केले।
बिकिनी पासून साडी पर्यंत कोणताही ड्रेस अगदी लीलया पेलणारी सई माझ्यासाठी फॅशन आयकॉन आहे।।
हास्य जत्रेत लहानातल्या लहान कलाकारांना सुद्धा मनापासून दाद देणारी सई पाहिली की ती एक उत्तम व्यक्ती आहे हे सिद्ध होते।।
पूर्वी गोबऱ्या गाल असणाऱ्या सईने आता वजन कमी केले आहे।तरी पण ती मला आताही तितकीच आवडते।।
सारे काही आजच सांगण्याचा उद्देश म्हणजे आज सईचा वाढदिवस आहे।।
"Happy birthday Sai--तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार।"
तू अश्याच सुंदर भूमिका करून आम्हाला आनंद देत राहावंसं आणि आम्ही तुझ्या प्रेमात पडत राहावं हीच देवाकडे प्रार्थना।।
आता हा माझा लेख वाचून सई कदाचित मला फोन करेल म्हणून खाली माझा मोबाईल नंबर ही मी देत आहे.. 😊😊
Dr Sunil v patil,kolhapur.
Mob.9822776236
छानच
उत्तर द्याहटवा