आसुरन....film riview

                  ।।आसुरन।।

       A film view by dr sunil.

प्रत्येक मनुष्यात एक राक्षस जिवंत असतो,जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा त्या मनुष्याला त्याच्यातला राक्षस जिवंत करावा लागतो.

अशी काहीशी theme असलेला 'असुरन'काल u tube वर हिंदी भाषेत पाहायला मिळाला.

पुमनी च्या 'वेक्काई' नावाच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा तामिळनाडूतील एका गावात घडलेल्या घटनेवरुन घेतला आहे.

वेत्रीमारन नावाच्या डायरेक्टर ने कमालीची पटकथा लिहिली आहे.जी आपल्याला पहिल्या दृश्यापासून बांधून ठेवते.

वेत्रीमारन ने अप्रतिम दिग्दर्शन केले आहे.

संवाद ,backround music जबरदस्त आहे.

वेलराज ची cinematography अफलातुन आहे.

सगळ्यात महत्त्वाचे ...धनुष चा अभिनय खूपच जबरदस्त झाला आहे.

सुरुवातीचा एक शांत व परिवारावर प्रेम करणारा पिता, त्याच्या परिवारावर संकट आल्यावर खवळून उठणारा वडील,जीवनात सुडामुळे होरपळून गेलेला प्रेमी,शेवटी सुडापेक्षा आणि रागापेक्षा परिवार महत्वाचा आहे हे सांगणारा शिवमनी धनुष ने अप्रतिम रंगवलाय.

एक तरुण आणि एक वयस्कर अशी दोन पात्रे त्याने समरसून केली आहेत।त्याचे डोळे,हावभाव,त्याची देहबोली फक्त पाहतच राहावी अशी आहे.

खरच तो फक्त साऊथ मधीलच नाही तर पूर्ण भारतातील एक समर्थ अभिनेता आहे यात शंका नाही.

मंजू वारीयार ने त्याच्या पत्नीची भूमिका छान केली आहे.बाकीच्या actors नि योग्य साथ दिली आहे.

अनेक अवॉर्ड मिळवलेली ही फिल्म नक्कीच न चुकवावी अशी आहे.

जे धनुष चे चाहते आहेत,ज्यांना कुछ हटके पहायची इच्छा आहे त्यांनी नक्की -असुरन--पहावा .

            Dr sunil v patil,

                            kolhapur

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review