The white tiger..Film riview
।।द व्हाईट टायगर।।
A film review by dr sunil..
जंगलात वाघ खूप असतात पण व्हाईट टायगर अगदी दुर्मिळ।तसेच नोकर आणि मालक यांच्या वर्षानुवर्षे पिढीजात चालत आलेल्या या नात्यातही कधीतरी एखादा गुलाम हा वेगळा विचार करणारा असू शकतो,या रुढीतून बाहेर पडून स्वतः चे स्थान निर्माण करू शकतो,अश्या कथेवर आधारित कादंबरीवरुन हा चित्रपट घेतला आहे।
प्रियांका चोप्राने प्रोड्युसर म्हणून वेगळा विषय निवडण्याचे धाडस केले आहे।
अरविंद अडेगा ची कथा आणि रमीन बेहरणीची पटकथा आपल्याला खिळवून ठेवते।
रमीन बेहरणी नि दिग्दर्शक म्हणून कथेला योग्य न्याय दिला आहे।
अभिनयात आदर्श गौरव या नवख्या अभिनेत्याने बाजी मारली आहे।त्याचा बलराम हलवाई अगदी न विसरता येण्याजोगा।हा कलाकार नक्कीच आपले वेगळे स्थान निर्माण करेल यात शंकाच नाही।
मालकाची भूमिका राजकुमार राव ने उत्तम निभावली आहे।तो खरच बॉलीवूडचा हिरा आहे।
बाकी प्रियांका चोप्रा ला फारसे काम नाही पण तिने छान भूमिका निभावली आहे।
ज्यांना comercial मसाला चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही।पण एक वेगळी थ्रिलर कथा ,उत्तम अभिनय पाहिल्याचे समाधान हा चित्रपट देतो ।।
..... डॉ सुनील पाटील ,कोल्हापूर।
मोजक्या शब्दांत छान समीक्षण. चित्रपट नक्की पाहणार आता
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाअचूक समीक्षण
उत्तर द्याहटवा